चला, मराठी ऑनलाईन करू या...

गेल्या दशकभरात इंटरनेटच्या वापराने सगळे जग एका क्लिकवर एकवटल्याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. यामध्ये छापील माध्यमांची जागा इंटरनेटवरील ब्लॉग्स, संकेतस्थळे, ई–बुक्स इ. सारखी माध्यमे घेऊ लागली आहेत. या माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार हे तर उघड गुपित आहे. आपली मराठी भाषा अशा ऑनलाईन वापरासाठी सक्षम करायची असेल तर युनिकोड (संगणकावर मराठीमधून टाईप करणे) शिकून या सर्व माध्यमांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअप यांसारखी माध्यमे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात वापरते, पण हा वापर बऱ्याचदा रोमन लिपीतून मराठी लिहिण्यापुरता मर्यादित राहतो. तेव्हा आपण सगळे युनिकोड शिकून मराठी वापरायला लागू तेव्हाच या माध्यमांवरील मराठीचा खऱ्या अर्थाने विकास होईल.

आजच्या काळात स्वतःला ऑनलाईन व्यक्त करायचे असेल तर ब्लॉगलेखनाला पर्याय नाही. आपल्याला सुचणारे विचार, कथा, कविता, लेख, चित्रे हे सगळं सगळं आपल्याल्या बलॉगच्या माध्यमातून जगभर पोहचवता येतं. गुगलसारख्या सर्च इंजिनवर मराठी भाषेतील एखादी माहिती आपण शोधतो बऱ्याचदा काहीच मिळत नाही आणि मिळाली तरी इंग्लिश भाषेच्या तुलनेत ती अगदीच जुजबी असते. इंटरनेटवर मराठी भाषेतूनही प्रत्येक माहिती मिळावी असे वाटत असेल तर मराठी भाषक म्हणून आपणच या माहितीत भर घालून आपली भाषा समृद्ध करायला हवी. विकिपीडिया हा जगभरातल्या भाषांना सामावून घेणारा ऑनलाईन मुक्तकोश आहे. ज्यामध्ये जगभरातले लोक आपापल्या भाषेचा वापर वाढावा म्हणून माहितीचे संकलन - संपादन करत असतात. यासाठी मराठी विकिपीडियावर माहितीचे संकलन आणि संपादन कसे केले जाते याविषयी या कार्यशाळेत जाणून घेता येईल. भाषेचे ऑनलाईन वापराचे आणखी एक माध्यम म्हणजे संकेतस्थळ (webite) होय. वेबसाईट निर्मितीची काही तांत्रिक कौशल्ये शिकून मराठी भाषेत आपल्याला विविध विषयांसाठी संकेतस्थळे बनवता येतील. मराठी भाषा त्यादृष्टीने समृद्ध करण्यासाठी आपणच सजग होऊन ही सगळी माध्यमे शिकून घेऊ या आणि आपली मराठी भाषा ऑनलाईन करू या.

कार्यशाळेची वैशिष्टये आणि अटीः –


कार्यशाळेचे मूल्य –


कार्यशाळेचे वेळापत्रकः- ७ ऑक्टोबर २०१६

वेळविषयवक्ते/th>
स. ८.०० ते स. ९.००नाव नोंदणी आणि चहापानवेळ
सं. ९.०० ते स. ११.००युनिकोड कार्यशाळातुषार पावर
सं. ११.०० ते दु. १.००ब्लॉगलेखन कार्यशाळाप्रसन्न जोशी आणि मंडळी
दु. १.०० ते दु. २.००जेवण
दु. २.०० ते दु. ४.००विकिपीडिया लेखन – संपादन कार्यशाळाविजय सरदेशपांडे
सायं ४.०० ते सायं. ६.००संकेतस्थळ निर्मितीडॉ. अंबुजा साळगावकर
सायं ६.०० ते सायं. ६.३०समारोप

ABOUT US

Institute of Distance and Open Learning (IDOL)

IDOL is a pride of University of Mumbai, which has launched its Diamond jubilee celebrations of its existence on 18th July 2016.IDOL has a glorious history of 45 years for providing higher education in Distance mode. Both, the Conventional and Professional Degree Programmes, are facilitated. Guidance and Support is available in person or through e-communications even during off-Office hours. Track record of enrollment, 81947 students admitted during 2015-16. Students top in Merit list of University of Mumbai and in Civil Service Examinations. Several of the Alumni have opted for higher education or employment abroad. Official site:-http://www.idoluom.org

IDOL is Marching towards its Golden Jubilee Celebrations, IDOL is set for providing Open Education in diverse domains that include Carrier guidance, Skill based training programmes in technology, management and fine arts and, training for enhancing employ-ability in niche areas of humanities.

ई – मेल आयडी – sadhanagore82@gmail.com

येथे नाव नोंदणी करावी. समन्वयकः- साधना गोरे

संपर्क – ९९८७७७३८०२

Webpage designed by Ms. Indrani Sen